पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेण्याचा निर्णय नाही ! – डॉ. प्रमोद सावंत
पणजी, ४ जानेवारी (वार्ता.) – पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेण्याविषयी अजूनही निर्णय झालेला नाही. याविषयी चर्चा चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
शासनाने नुकतीच झालेली जिल्हा पंचायत निवडणूक पक्ष पातळीवर घेतली होती आणि याच धर्तीवर पालिका निवडणूक पक्ष पातळीवर घेतली जाणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ही माहिती दिली.
राज्यातील पालिका मंडळांची निवडणूक फेब्रुवारी मासात होण्याची शक्यता आहे आणि राज्य निवडणूक आयोग पुढील काही दिवसांत पालिका निवडणुकीचा दिनांक आणि कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता आहे.