केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा ७ जानेवारीला कणकवलीत ट्रॅक्टर मोर्चा
देवगड – केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ ७ जानेवारीला कणकवली शहरातील भाजप कार्यालय ते प्रांत कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप किसान मोर्चा प्रांताध्यक्ष अनिल बोंडे, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे आदी नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजप देवगड तालुका किसान मोर्चा अध्यक्ष संजय मुळम यांनी दिली. या वेळी माजी आमदार अधिवक्ता अजित गोगटे, भाजप जिल्हा चिटणीस बाळा खडपे आदी उपस्थित होते.