‘फेसबूक’वर हिंदूंचा अवमानकारक उल्लेख करणार्या धर्मांधाला ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ आस्थापनाने नोकरीवरून काढून टाकले
गोरेगाव (मुंबई) येथील धर्मप्रेमी श्री. नंदू यांच्या तक्रारीचा परिणाम
हिंदूंच्या अवमानाच्या विरोधात तत्परतेने आवाज उठवणारे धर्मप्रेमी श्री. नंदू आणि तक्रारीची नोंद घेऊन धर्मांधावर तत्परतेने कारवाई करणारे ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ आस्थापन यांचे अभिनंदन !
मुंबई, ४ जानेवारी (वार्ता.) – ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ या आस्थापनामध्ये ‘सेल्स मॅनेजर’ची नोकरी करणारा फैसल गुलाम नबी या धर्माधाने त्याच्या ‘फेसबूक’ वरून हिदूंची तुलना कुत्र्याशी करून हिंदूंचा अवमान केला होता. याविषयी हिंदु धर्मप्रेमी श्री. नंदू यांनी केलेल्या तक्रारीनंतर ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ आस्थापनाने नबी याला नोकरीवरून काढून टाकले आहे.
श्री. नंदू हे गोरेगाव येथे रहाणारे असून त्यांनी फेसबूक वर फैसल गुलाम नबी यांची आक्षेपार्ह पोस्ट पाहिली. सामाजिक प्रसारमाध्यमावरून फैसल हे ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ आस्थापनात नोकरी करत असल्याचा संदर्भ श्री. नंदू यांना मिळाला. त्यानंतर श्री. नंदू यांनी या प्रकाराविषयी ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ आस्थापनाला ‘ई मेल’ करून फैसल याने हिंदूंविषयी केलेल्या आक्षेपार्ह लिखाणाची माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली. श्री. नंदू यांनी पाठवलेल्या ‘ई मेल’ ला ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ आस्थापनाकडून उत्तर पाठवण्यात आले. यामध्ये ‘आम्ही समान हक्क, धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकता यांना महत्त्व देतो. या मूलभूत मूल्यांच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही वर्तनास आम्ही मान्यता देत नाही. आम्ही कठोर शिस्तभंगाची कारवाई चालू केली आहे. ती व्यक्ती यापुढे आमच्या आस्थापनाशी संबंधित नाही. फैसल गुलाम नबी यांना नोकरीवरून काढून टाकले आहे’, अशी माहिती ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’कडून श्री. नंदू यांना कळवण्यात आली. (श्री. नंदू यांच्याप्रमाणे सर्व हिंदूंमध्येही हिंदु धर्माविषयीचा अभिमान निर्माण झाल्यास हिंदु धर्म आणि हिंदु समाज यांकडे कुणाचे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धारिष्ट्य होणार नाही ! – संपादक)