देशातील अनेक राज्यांत अचानक मरत आहेत पक्षी !
काही ठिकाणी बर्ड फ्लूचे कारण
पुढे असेच माणसांचे मृत्यू झाल्यास आश्चर्य वाटू नये !
नवी देहली – इटलीची राजधानी रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
(सौजन्य : Navbharat Times नवभारत टाइम्स)
१. हिमाचल प्रदेशातील पोंग धरणाच्या परिसरात १ सहस्र ४०० हून अधिक प्रवासी पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढील सूचना मिळेपर्यंत धरणाजवळ पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत मृत पक्षांचे काही नमुने पाठवण्यात आले आहेत.
२. राजस्थानच्या जयपूर समवेत ७ जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत १३५ कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
३. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एका महाविद्यालयाजवळही बर्ड फ्लू मुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन याची चौकशी करत आहे.
४. गुजरातच्या जुनागडच्या बांटला गावामध्येही ५३ पक्षांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारणही बर्ड फ्लू असल्याचे सांगितले जात आहे.