सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे प्रारंभ
भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला (जिल्हा सोलापूर) – शेतकर्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने, तसेच वरिष्ठांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे चालू झाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.
१. सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतमालाला देहली येथील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला येथून सप्ताहातील मंगळवार आणि गुरुवार हे २ दिवस किसान रेल्वे चालू करण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल, सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठपुरावा केला होता.
२. या पाठपुराव्याला यश लाभले असून रेल्वे मंत्रालयाने सांगोला ते आदर्शनगर (देहली) ही दुसरी रेल्वे चालू केली आहे. सांगोला रेल्वे स्थानकातून मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशी आदर्शनगरसाठी (देहली) किसान रेल्वे चालू झाल्याने सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना फळे आणि शेतीमाल देहलीच्या बाजारपेठेत पाठवणे सुलभ झाले आहे.