श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतले श्री भवानीदेवीचे दर्शन
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे गडकोट मोहिमेविषयी बैठक
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे श्री भवानीदेवीचे दर्शन घेतले. यंदाच्या वर्षी होणार्या गडकोट मोहिमेविषयी (विशाळगड ते पन्हाळगड २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१) पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक येथील दशावतार मठ येथे घेण्यात आली.
या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी किल्ले रायगड येथे होणार्या ३२ मण सुवर्णसिंहासन आणि खडा पहारा यांची नोंदणी लवकर पूर्ण करण्यास सांगितले. या बैठकीला दशावतार मठाचे मठाधिपती महंत मावजीनाथ महाराज, अरण्य मठाचे मठाधिपती महंत व्यंकट अरण्य महाराज यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.