मंगळुरूमधील मंदिरांच्या अर्पण पेट्यांमध्ये सापडलेल्या बनावट नोटांवर धार्मिक द्वेष पसरवणारे लिखाण
गर्भनिरोधकही सापडले !
चर्च आणि मशीद यांच्या अर्पण पेट्यांमध्ये कधी असे झाल्याचे ऐकिवात आहे का ? हिंदूंच्या मंदिरांना विविध मार्गांनी लक्ष्य केले जात आहे आणि हिंदू त्याविषयी निद्रिस्त आहेत, हे लज्जास्पद !
मंगळुरू (कर्नाटक) – शहरातील मंदिरांच्या अर्पणपेट्यांमध्ये धार्मिक द्वेष पसरवणारे आणि अपमानकारक लिखाण असलेल्या बनावट नोटा आणि गर्भनिरोधक सापडले आहेत. जिल्ह्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे शहरात जिहादी आतंकवाद पसरवणारे लिखाण भिंतीवर आढळून आल्यानंतर काही दिवसांनीच हा प्रकार घडला. अशा घटना शहरातील ३ ठिकाणी घडल्याचे सांगितले जात आहे.
Hate messages on dummy notes in Karnataka: Congress, BJP seek action https://t.co/Vco2loOHS6
— TOI Mangaluru (@TOIMangalore) January 3, 2021
१. सूत्रांनी सांगितले की, भगवान श्री बब्बूस्वामी मंदिराच्या अर्पणपेटीत २०० रुपयांची नोट आढळून आली. मंदिराचे कर्मचारी आणि हिंदु धार्मिक नेते यांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे. ‘या कृत्यामागील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ಮಂಗಳೂರಿನ ಬೊಬ್ಬು ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಹುಂಡಿಯಲ್ಲಿ ಏಸು ಕ್ರಿಸ್ತ ಮಾತ್ರ ಆರಾಧಿಸಿ& ಹಿಂದೂಗಳನ್ನು ಸಾಯಿಸಿ ಎಂದು ಕರೆನ್ಸಿ ನೋಟ್ ದಲ್ಲಿ ಬರೆದು ಹಾಕಿರುವುದು ಖಂಡನೀಯವಾಗಿದೆ.
ಇದು IPC 295 A & Banking Regulations act 1949 ಪ್ರಕಾರ ಗಂಬೀರ ಅಪರಾಧವಾಗಿದೆ.@compolmlr ಅಪರಾಧಿಗಳನ್ನು ಕೂಡಲೇ ಬಂಧಿಸಿ.https://t.co/cV0Iv2Lrik
— Mohan Gowda (@Mohan_HJS) January 2, 2021
(Translation – It is condemned in a currency note that only Jesus Christ worshiped & killed Hindus in the hood of Bobu Swamy Temple in Mangalore. This is an offense under the IPC 295 A & Banking Regulations Act 1949. @compolmlr Immediately arrest the offenders.— Mohan Gowda)
२. बनावट नोटांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत. त्यांवर लिहिले आहे, ‘प्रत्येकाने केवळ येशू ख्रिस्तालाच प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येक मुसलमानाला डुकरांना मारतात तसे मारले पाहिजे.’
(सौजन्य : Udayavani)
(वरील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)