(म्हणे) ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या चर्चच्या भूमीत झालेल्या धार्मिक विधीचा निषेध ! – एलिना साल्ढाणा, भाजपच्या स्थानिक आमदार
शंखवाळी तीर्थक्षेत्री पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम यांना स्थानिक ख्रिस्त्यांनी तीव्र विरोध केल्याचे प्रकरण
ती भूमी कोणाचीही वैयक्तिक नाही, तर सरकारची आहे ! असे असतांना हिंदूंना तेथे जाण्यापासून कोणत्या आधारावर रोखले जात आहे ?
वास्को, ३ जानेवारी (वार्ता.) – सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळी) ३० डिसेंबर या दिवशी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजा-अर्चा आणि नामस्मरण यांचा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम चालू असतांना स्थानिक ख्रिस्त्यांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही चर्चची भूमी असल्याचा दावा करून पोलिसांवर दबाव आणून भक्तगणांचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद पाडला. या प्रकरणी सांकवाळ येथील ‘पेरिशनर्स’ (चर्चचे सदस्य) यांनी स्थानिक सरपंच रमाकांत बोरकर आणि कुठ्ठाळीच्या भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांची भेट घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे पूजा-अर्चा करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. (दुसर्या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्या ख्रिस्त्यांनी हिंदूंनी पूजा कोठे करावी, हे शिकवू नये ! – संपादक)
‘पेरिशनर्स’चा कांगावा !
या प्रकरणी सांकवाळ येथील ‘पेरिशनर्स’नी स्थानिक सरपंच आणि आमदार यांची २ जानेवारी या दिवशी भेट घेतली. या वेळी सांकवाळ येथील ‘पेरिशनर्स’ म्हणाले, ‘‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी पूजा-अर्चा केल्याच्या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. सांकवाळ येथे सर्व धर्माचे लोक कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने रहात आहेत; मात्र काही स्थानिक आणि गावाबाहेरील लोक गावातील शांती भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार थांबवला पाहिजे. पूजा-अर्चा करण्यासाठी आलेल्या २५ जणांवर पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवला पाहिजे. ३० डिसेंबर या दिवशी पूजा-अर्चा करण्यासाठी आलेल्यांनी चर्चच्या भूमीत अतिक्रमण केले आहे.’’ (ख्रिस्त्यांनी मंदिराच्या भूमीवर केलेले अतिक्रमण हिंदूंनी खपवून घेणे; म्हणजे गुण्यागोविंदाने नांदणे, असे आहे का ? पोलिसांनी काय करावे, हे ख्रिस्त्यांनी कशाला सांगायला हवे ? – संपादक)
या प्रकरणी भाजपच्या स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा म्हणाल्या, ‘‘चर्चची भूमी असलेल्या ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ इतर धर्मातील लोकांनी पूजा-अर्चा करून तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. या कृतीचा मी निषेध करते. या घटनेला अनुसरून प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करण्याची मागणी मी वेर्णा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. मुरगाव तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांकडे या विषयाला अनुसरून ४ जानेवारी या दिवशी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.’’ (‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ची भूमी पुरातत्व खात्याकडे आहे ! ती खाजगी नसून सार्वजनिक भूमी आहे ! सार्वजनिक भूमीवर जाण्यापासून कोणालाही रोखता येत नाही, हेही ठाऊक नसलेले लोकप्रतिनिधी ! – संपादक)
वारसास्थळी होणार्या अनधिकृत कृत्यांवर आळा बसणे आणि हिंदु-ख्रिस्ती यांच्यामधील एकसंधता कायम रहाणे आवश्यक ! – जयेश नाईक, अध्यक्ष, स्वामी समर्थ समिती
‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी ३० डिसेंबर या दिवशी धार्मिक पूजा-अर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी समर्थ समितीचे अध्यक्ष जयेश नाईक या घटनेला अनुसरून म्हणाले, ‘‘सांकवाळ गावातील काही लोक या घटनेला विनाकारण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ याठिकाणच्या स्थान महात्माविषयी आणि आता या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत कृतीविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी त्या ठिकाणी ३० डिसेंबर या दिवशी एक बैठक घेण्यात आली. ‘हिंदु-ख्रिस्ती यांच्यामधील एकसंघ भाव कायम रहावा’, असे आम्हाला वाटते. येथील श्री विजयादुर्गेचे मंदिर पोर्तुगिजांनी नष्ट केले. आता येथे श्री विजयादुर्गा मंदिराचे प्रवेशद्वार राहिले असून ते वारसास्थळ म्हणून घोषित झालेले आहे. त्याला ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ असे संबोधले जाते. सरकार दरबारी कुठल्याही धर्माच्या नावावर हे स्थान नोंद झालेले नाही. या ठिकाणी धार्मिक महत्त्व असलेले आणि स्थानिक हिंदू दिवा लावून अन् नारळ ठेवून प्रार्थना करत असलेले एक वडाचे झाड वर्ष २०१५ मध्ये कापण्यात आले. स्थानिक ख्रिस्ती गेली ३ वर्षे नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी फेस्ताचे आयोजन करत आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. चुकीच्या भूमी सर्व्हे क्रमांकावर शासनाची अनुमती घेऊन अनधिकृतपणे श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी (द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ) स्थानिक ख्रिस्ती फेस्ताचे आयोजन करत आहे.’’
‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाची पार्श्वभूमी
‘सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर पूर्वी पोर्तुगिजांनी पाडले आणि त्या ठिकाणी ख्रिस्त्यांनी चर्च बांधले. हे चर्चही पुढे नामशेष झाले. या ठिकाणी पुरातन बांधकामाचा एक भाग अजूनही अस्तित्वात आहे आणि या भागाला राज्याच्या पुरातत्व अन् पुराभिलेख खात्याने वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. या भागाला खात्यात ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) असे संबोधले गेले आहे. ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या नावातही किंवा शासकीय कागदोपत्री ही चर्चची भूमी असा कुठेही उल्लेख नाही’, असा श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तगणांचा दावा आहे, तर स्थानिक ख्रिस्ती ही भूमी ख्रिस्त्यांची असल्याचा दावा करत आहे. तसेच पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याने ‘वारसास्थळ हे सार्वजनिक स्थान असल्याने लोकांना त्या ठिकाणी जाण्यापासून वंचित करता येत नाही’, अशी सूचना सांकवाळ येथील ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’चे फादर लुईस आल्वारिस यांना १५ डिसेंबर २०१७ या वर्षी दिली आहे, तरीही ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही ख्रिस्त्यांची भूमी असल्याचा दावा स्थानिक ख्रिस्ती करत आहेत.