‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या वतीने २०० हून अधिक जणांना विनामूल्य भोजन वाटप
कोल्हापूर – महाराष्ट्र्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. १ जानेवारी या दिवशी ‘महाराष्ट्र्र राज्य मराठी पत्रकार संघा’चे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे आणि राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या वतीने जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाजीराव फराकटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विनामूल्य भोजन वाटप करण्यात आले. २०० हून अधिक गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
या वेळी कोल्हापूर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाजीराव फराकटे, माजी कोल्हापूर शहर अध्यक्ष संपत नरके, माजी पोलीस अधिकारी पंढरीनाथ मांढरे, प्रसाद निकम, महेश पाटील, विजय देसाई, सूर्यकांत गवळी, कुमार चांदम, वैभव लोहार यांच्यासह ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’चे पदाधिकारी उपस्थित होते.