आंध्रप्रदेशात आता सीतामातेच्या मूर्तीची तोडफोड !
|
विजयवाडा (आंध्रप्रदेश) – येथील नेहरू बसथांब्याजवळील सीताराम मंदिरात सीतामातेच्या मूर्तीची तोडफोड केलेली आढळली. विजयनगरम् जिल्ह्यातील श्रीराम स्वामी देवस्थानम् येथे भगवान श्रीराम यांची ४०० वर्षे जुनी मूर्ती आणि राजामुंद्री जिल्ह्यातील भगवान विघ्नेश्वर मंदिरातील भगवान श्री सुब्रह्मण्येश्वर स्वामी यांची मूर्ती गेल्या काही दिवसांत तोडफोड झालेल्या अवस्थेत सापडली होती.
भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना फटकारतांना विचारले की, अशा घटना केवळ हिंदूंच्या संदर्भातच का घडत आहेत ?
Today in Vijayawada. This is the 126th idol which got https://t.co/u4HONPcFy7 a sitarama temple, the grilled door was locked and they thrown coconuts and damaged Sita devi. ఈరోజు విజయవాడలో సీతమ్మ వారి విగ్రహం @BJP4India @BJP4Andhra @RSSorg @VHPDigital @PMOIndia @DrMohanBhagwat pic.twitter.com/k7JvaMydYt
— Yamini Sharma Sadineni (@YaminiSharma_AP) January 3, 2021
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
जगनमोहन रेड्डी ख्रिस्ती असू शकतात; मात्र हिंदूंचे धर्मांतर करू शकत नाहीत ! – एन्. चंद्रबाबू नायडू
तेलुगु देसम् पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन्. चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले की, जगनमोहन रेड्डी हिंदूंचा विश्वासघात करणारे आहेत. रेड्डी ख्रिस्ती असू शकतात; परंतु ते हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी या पदाचा दुरूपयोग करू शकत नाहीत. तसा विचार करणे, हेदेखील चुकीचे आहे. जर सत्तेत असलेले लोक धर्मांतराचा अवलंब करत असतील, तर ते विश्वासघात करण्यासारखे आहे. एखाद्याने अशी धार्मिक असहिष्णुता दर्शवू नये.