राजस्थान येथील श्री देवनारायण मंदिराच्या भूमीपूजनासाठी दूध, दही आणि तूप अशी एकूण ११ सहस्र लिटर सामुग्री वापरल्याने प्रसारमाध्यांची टीका
हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ते कृती करत असतील, तर प्रसारमाध्यमांना पोटशूळ का उठतो ?
नवी देहली – राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील रतलाई प्रदेशात बांधण्यात येणार्या श्री देवनारायण मंदिराच्या भूमीपूजन समारंभामध्ये दूध, तूप आणि दही अशी एकूण ११ सहस्र लिटर सामुग्री वापरण्यात आली. या सर्वाची किंमत साधारणत: दीड लाख रुपये आहे. यावरून काही प्रसारमाध्यमांनी टीका केली आहे. या भूमीपूजन सोहळ्याचे संयोजक रामलाल म्हणाले, ‘‘गुर्जर समाजातील देवता टाकाऊ नाहीत; कारण देवता आमच्या गुरांचे रक्षण करतात; म्हणून आम्ही श्री देवनारायणांवर दुधाने स्नान घालतो.’’