मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार
३ वर्षांत बांधकाम पूर्ण होणार
नवी देहली – मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे. ३ वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिली.
Ram temple construction to begin from Makar Sankrant#ChampatRai#NarendraModi#MakarSankranti2021#AyodhyaRamMandir #UttarPradesh #SupremeCourt pic.twitter.com/oYc2f58aKc
— United News of India (@uniindianews) January 2, 2021
ट्रस्टने सांगितले की, ५ एकर जागेमध्ये बांधले जाणारे हे मंदिर ३ मजली असणार आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असेल. या बांधकामासाठी साधारण ४०० वर्षांपर्यंत तग धरेल अशा सिमेंटचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या दर्शनी भागात २२ पायर्या असतील, तर ज्येष्ठ आणि विकलांग नागरिकांसाठी उद्वाहन आणि सरकते जिने यांचीही सुविधा असणार आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला ६५ एकर क्षेत्रामध्ये विविध बांधकामे केली जाणार आहेत.