(म्हणे) ‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या महापुरुषांनी ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य स्थापन केले !’ – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी इतिहास नाकारून हिंदवी स्वराज्याला ‘धर्मनिरपेक्ष’ ठरवणारे हिंदुद्रोही काँग्रेसवाले !
मुंबई, ३ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते, केवळ हिंदूंचे नव्हे. ते केवळ मराठा समाजाचे राजे नव्हते, तर अठरापगड जातींचे ते राजे होते. त्या काळी जातीविरहित ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य या महापुरुषांनी स्थापन केले, असे ‘ट्वीट’ करून काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला ‘धर्मनिरपेक्ष’ ठरवणारे वक्तव्य केले आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांना ‘धर्मनिरपेक्ष’ ठरवून मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा आणि हिंदूंना तेजोहीन करण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले गेली अनेक दशके करत आहेत; मात्र त्याचा हिंदु समाजावर परिणाम झाला नाही. यामुळे काँग्रेसचे खरे स्वरूप उघड होऊन हिंदूंना त्यांना मतपेटीद्वारे धडा शिकवला. तरीही काँग्रेसवाल्यांना शहाणपण सुचत नाही, हे दुर्दैवी ! – संपादक) औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी सावंत यांनी वरील ‘ट्वीट’ केले.
त्याचबरोबर ते केवळ मराठा समाजाचे राजे नव्हते तर अठरापगड जातींचे ते राजे होते. ज्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला संभाजी महाराजांनाही त्यांनी विरोधच केला. त्याकाळी जातीविरहीत धर्मनिरपेक्ष राज्य या महापुरुषांनी , आमच्या दैवतांनी स्थापन केले.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 2, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्यांच्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफ अशी ठेवली होती. ते तत्कालीन सुफी संत शाह शरीफजी यांच्यावरील श्रद्धेने ठेवली होती. त्यांच्या राज्यात एक-तृतीयांश मुसलमान होते. ज्या ‘विचारांनी’ शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, संभाजी महाराजांनाही त्यांनी विरोधच केला, असे सावंत यांनी म्हटले आहे. (मुसलमानांचे तळवे चाटायचे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे. त्याच धर्मनिरपेक्षतेचे गोडवे सावंत यांना गायचे असतील, तर त्यांनी प्रथम मुसलमानांना धर्मनिरपेक्षता शिकवावी. ते धारिष्ट्य नसल्यामुळे काँग्रेसवाले हिंदूंना फुकाचे सल्ले देत आहेत आणि हिंदूंमध्येच दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते; पण ‘ब्राह्मणांनी छत्रपतींना विरोध केला’, असे सुचवून सावंत जातीयवादी विधाने का करत आहेत ? छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व स्वीकारायची सावंत यांना लाज वाटते का ? त्यामुळे महाराजांच्या आजोबांचे दाखले देऊन आणि सैन्यांत एक-तृतीयांश मुसलमान असल्याची धादांत खोटी माहिती सांगून हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचे उद्योग आता काँग्रेसने बंद करावेत ! – संपादक) |