आगामी विधानसभा निवडणूक भाजप सहज जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
मडगाव, २ जानेवारी (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणूक भाजप सहज जिंकणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा दावा केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सिद्ध झाला आहे. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेतले जाणार आहेत. आगामी निवडणुकीनंतर ‘गोमंतकियांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवला’, असे चित्र दिसेल.’’