भ्रमणभाष सुविधा सुधारण्यासाठी २०० भ्रमणभाष मनोरे उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव
पणजी, २ जानेवारी (वार्ता.) – गोवा शासनाने ‘गोवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी २०२०’ अंतर्गत राज्यात ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यासाठी एकूण २०० भ्रमणभाष मनोरे उभारण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ६२, तर दुसर्या टप्प्यात १३८ भ्रमणभाष मनोरे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘भ्रमणभाष मनोरे उभारल्याने विद्यार्थी, ‘आयटी’ व्यावसायिक, ‘टॅक स्टॉर्टअप’ आदी समाजाच्या विविध घटकांना लाभ होणार आहे.’’