सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा निष्कर्ष मुंबई पोलिसांप्रमाणेच असेल ! – परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, मुंबई
मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अन्वेषणात अनेक गोष्टींचा उलगडला झाला; मात्र सुशांत यांचा मृत्यू कशामुळे झाला ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा या प्रकरणात जो निष्कर्ष काढेल, तो मुंबई पोलिसांच्या निष्कर्षासारखाच असेल, असा विश्वास मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला आहे.
या वेळी परमवीर सिंग म्हणाले, ‘‘काही जण मुंबई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी यांची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत; मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.’’
सायबर गुह्यांचा धोका लक्षात घेता लवकरच शहरात ५ सायबर पोलीस ठाणी चालू करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.