अंबरनाथ येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
ठाणे – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, तसेच गीताजयंती आणि तुळशीपूजन दिनानिमीत्त २५ डिसेंबर या दिवशी अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्व. वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
या वेळी भा.ज.यु.मो. कल्याण जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. विनायक जोशी यांच्या हस्ते येथे उपस्थित असलेल्यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले. या वेळी अंबरनाथ येथील एकलव्य फाऊंडेशनचे संस्थापक सर्वश्री कुमार भोसले, अतुल सिंह, अशिष चौधरी, विक्रम गुप्ता, सागर कोळी, शुभम माळी आदी उपस्थित होते.