गांजाची लागवड ही केवळ औषधनिर्मिती आस्थापनांशी निगडित ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री
पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात वादग्रस्त ठरलेली गांजाची लागवड ही केवळ औषधनिर्मिती आस्थापनांशी निगडित होती आणि ही लागवड टाळेबंद स्थितीत करण्यात येणार होती. विरोधी पक्षांनी याविषयी राजकारण केले, असे प्रतिपादन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत वीजमंत्री नीलेश काब्राल बोलत होते.