संभाजीनगर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धर्मांध मेहबूब शेखच्या प्रतिमेचे जळगाव येथे दहन !
भाजप महिला आघाडीचा प्रतिमेला चप्पल मारून निषेध !
संभाजीनगर – येथील धर्मांध मेहबूब शेख याने खासगी शिकवणीवर्ग घेणार्या एका तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली असून जळगाव येथील टॉवर चौकात भारतीय जनता युवा मोर्चा, भाजप महिला आघाडीच्या वतीने शेख याच्या प्रतिमेस चप्पल मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. या वेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. दीप्ती चिरमाडे आणि जळगावच्या महापौर सौ. भरती सोनवणे यांनी ‘गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शेख यास तात्काळ अटक करून जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात दावा चालवण्यात यावा’, अशा मागण्या केल्या. या आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या असंख्य महिला उपस्थित होत्या.