देवीला ओटी भरणे
‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.
देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
अ. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.
आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.
ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.
उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.
देवीला नऊवारी साडी अर्पण करणे योग्य कसे ?
देवीला नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य असते. नऊवारी साडीतील नऊ वार किंवा स्तर हे श्री दुर्गादेवीची नऊ रूपे दर्शवतात. श्री दुर्गादेवीला नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे तिला तिच्या नऊ अंगांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय !
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाचे शास्त्र’)