ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव रहित
माण (दहिवडी) तहसिलदार यांनी माहिती दिली
सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – माण तालुक्यातील श्रीराम भक्तांचे श्रद्धास्थान ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथील पुण्यतिथी महोत्सव कोरोनामुळे रहित करण्यात आला आहे. सोहळ्यातील गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती माणच्या (दहिवडी) तहसिलदार यांनी दिली आहे.
तहसिलदार पुढे म्हणाल्या की, धार्मिक विधी मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत मंदिरात करण्याच्या सूचना मंदिर प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंदिर विश्वस्तांनी पुण्यतिथी महोत्सव स्थगितीस अनुमती दिली आहे. तसेच भाविकांनीही प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.