शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे स्मारक स्वच्छता आणि अभिवादन मोहीम
कोल्हापूर – शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने १ जानेवारी या दिवशी रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी ७ वाजता स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. उद्यानातील सर्व पालापाचोळा गोळा करून नगरपालिकेच्या कचरा गाडीत टाकण्यात आला. त्यानंतर पाण्याच्या टँकरद्वारे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, मूर्ती आणि स्मारक परिसर यांची स्वच्छता करण्यात आली. स्मारक परिसरात असलेला छत्रपती शंभूराजेंच्या जीवनविषयक माहितीचा जीर्ण झालेला फलक पालटून तोसुद्धा नवीन लावण्यात आला. ध्वजस्तंभावर नवीन भगवा ध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर छत्रपती शंभूराजेंच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून नमन करण्यात आले.
या उपक्रमात शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. साताप्पा कडव, उपाध्यक्ष श्री. योगेश रोकडे, सर्वश्री संदीप पाडळकर, प्रफुल्ल भालेकर, नीलेश पिसाळ, प्रवीण कुरणे, सुनील यादव, गणेश मांडवकर, बजरंग गावडे, तुकाराम खराडे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.