आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा कि सत्तेची लाचारी ! – आमदार नीतेश राणे, भाजप
मुंबई, १ जानेवारी (वार्ता.) – काँग्रेसने सांगून टाकले, ‘संभाजीनगर’ होणार नाही. आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्तवाचा कि सत्तेची लाचारी. संभाजीराजे यांचा स्वाभिमान महत्त्वाचा कि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेला केला आहे. औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..
बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!
संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2020
याविषयी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे म्हटले आहे. यावरून आमदार नीतेश राणे यांनी वरील ‘ट्वीट’ केले आहे.