कोरोना योद्धयांचा ‘फिनिक्स फाऊंडेशन’च्या वतीने सत्कार
सांगली – महाराष्ट्रातील विविध क्रीडा प्रकारांतील ४५ खेळाडू, ६ शिक्षक, १० प्रशिक्षक, तसेच मिरज येथील १० कोरोना योद्धे यांचा ‘फिनिक्स फाऊंडेशन’ आणि ‘रोलर स्केटिंग क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र’ यांच्या वतीने सांगली येथील खरे सांस्कृतिक हॉल येथे सत्कार करण्यात आला. ‘रोलर स्केटिंग क्रिकेट असोसिएशन’चे प्रदेशाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, न्यायाधीश श्री. मुकुंद दाते, उपायुक्त सौ. स्मृती पाटील, नगरसेवक श्री. विनायक सिंहासने, सर्वश्री मनोज यादव, विनायक ऐनापुरे, धनंजय बानूसे, तसेच अन्य उपस्थित होते.