हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्याने, प्रशासनाला निवेदन देणे आदी माध्यमांतून ३१ डिसेंबरच्या विरोधात चळवळ
नववर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्यालाच साजरे करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील हिंदुत्वनिष्ठांची बैठक
कोलकाता – नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांतील धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठ लोकांसाठी ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी १ जानेवारीला नववर्ष साजरे न करण्याविषयी आणि यासंदर्भात परिचितांचेही प्रबोधन करण्याविषयी उपस्थितांना विचारल्यावर सर्वांनी उत्स्फूर्तपणे ‘आम्ही शपथ घेतो की, आम्ही कधीच नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणार नाही आणि यांविषयी इतरांचेही प्रबोधन करणार’, असा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमन्त देवनाथ यांनी ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होत असलेले अपप्रकार आणि १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करण्याचे दुष्पपरिणाम यांविषयी उपस्थितांना अवगत केले. तसेच हिंदूंचे नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला साजरे करण्याचे महत्त्व सांगितले.
हिंदुत्वनिष्ठांनी केलेली प्रतिज्ञा
‘आम्ही धर्म संस्थापना करणार्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रतिज्ञा करतो. आम्ही आम्ही आमचे सर्वश्रेष्ठ पूर्वज असलेल्या ऋषी-मुनींनी घालून दिलेल्या परंपरेचे अभिमानाने पालन करू. आम्ही नववर्ष ३१ डिसेंबरला रात्री अथवा १ जानेवारीला साजरे करणार नाही. आम्ही नूतन वर्ष हिंदु पंचांगानुसार गुढीपाडव्याला साजरे करू. १ जानेवारीला आम्ही कोणालाही शुभेच्छा देणार नाही. गुढीपाडव्याला शुभेच्छा देऊ. आम्ही आमच्या नातेवाइकांनाही हिंदु नूतन वर्ष युगादी-गुढीपाडव्याविषयी सांगून धर्मजागृती करू. आम्ही आमचे प्राण असेपर्यंत आपला इतिहास, परंपरा, आचरण यांचे पालन करू.
आजकल, ३१ दिसंबर की रात्रि में छोटे बालकों से वृद्धों तक सभी एक-दूसरे को संदेश भेजकर अथवा प्रत्यक्ष मिलकर हैपी न्यू इयर कहते हुए शुभकामनाएं देते हैं ।
वास्तविक, भारतीय संस्कृति के अनुसार भारत के विविध क्षेत्रों में अलग अलग दिन नववर्ष मनाया जाता है ।#MyNewYear_HinduNavVarsh pic.twitter.com/KPKsu1LfOB
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) December 31, 2020
अपप्रकार रोखण्यासाठी देहली आणि केंद्र सरकार यांना निवेदन
फरीदाबाद (हरियाणा) – ३१ डिसेंबरला रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडणे, धूम्रपान करणे, मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या घटना घटतात. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघात होतात. सध्या कोरोनाचे संकट असतांना राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी या दिवसांत कुणी जाऊ नये, मेजवान्यांना अनुमती देऊ नये, फटाके फोडणे यावर बंदी घालावी, आदी मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, देहली प्रदूषण नियंत्रण समिती, देहली राज्य पर्यावरण मंत्रालय आणि देहली राज्याच्या सर्व जिल्हा आयुक्तांना इमेल द्वारे देण्यात आले.
इंदूर (तेलंगाणा) येथील केबलवाहिनीवरील चर्चासत्रात सहभाग
इंदूर (तेलंगाणा) – येथे ३१ डिसेंबरच्या रात्री होणार्या ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या संदर्भात ‘के ६’ या केबलवाहिनीवरून एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु जनजागृती समितीचे इंदूर जिल्हा समन्वयक नेला तुकाराम सहभागी झाले होते.
बेंगळुरू येथे ‘हिंदु संस्कृती आमचा अभिमान’ या विषयावर प्रवचन
बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीकडून २५ डिसेंबर या दिवशी ऑनलाईनच्या माध्यमातून ‘हिंदु संस्कृती आमचा अभिमान’ या विषयावर प्रवचनाचे नियोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांतून ३५० पेक्षा अधिक युवक-युवती यात सहभागी झाले होते. त्यांनी ३१ डिसेंबरला नव्हे तर गुढीपाडव्यालाच नूतन वर्षारंभ साजरे करण्यात येईल अशी प्रतिज्ञा केली. हे प्रवचन सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनी घेतले. समितीचे श्री. रमेश रायचुरू यांनीही मार्गदर्शन केले.
गोमंतकातून ३१ डिसेंबरची विकृती हद्दपार करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊया ! – निरंजन चोडणकर
पणजी, ३१ डिसेंबर – ३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्याची रूढ झालेली कुप्रथा म्हणजे भारतीय संस्कृतीला लागलेली कीड आहे. यातून युवा पिढीचे नैतिक अध:पतन होत असून राष्ट्र आणि धर्म यांचा र्हास होत आहे. हे रोखण्यासाठी तरुणाईचे प्रबोधन करणे आवश्यक आहे; म्हणूनच ३१ डिसेंबर ही विकृती पवित्र परशुराम भूमीतून हद्दपार करण्याची प्रतिज्ञा करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० डिसेंबर या दिवशी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. निरंजन चोडणकर बोलत होते.
प्रत्येक कुटुंबाने ‘माझे नववर्ष गुढीपाडव्याला’, हे ठामपणे आत्मसात केले पाहिजे. कार्यक्रमात प्रस्तावना, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रचीती गावणेकर यांनी केले.