महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती
मुंबई – महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी जयस्वाल यांची नियुक्ती ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असणार आहे.
सुबोध जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवर जाण्याने पोलीस दल आणि राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय.#AbpMajha #NewsIupdate #LatestNews @RajatVAbphttps://t.co/hjuvOOVJME
— ABP माझा (@abpmajhatv) December 31, 2020
राज्यात महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर राज्यातील पोलीस भरतीप्रक्रियेवरून शासन आणि जयस्वाल यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर सुबोध जयस्वाल यांनी राज्यशासनाला पत्र पाठवून केंद्रशासनाकडे सेवेत जाण्याची विनंती केली होती.