करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मुखदर्शनास आजपासून प्रारंभ!
श्री महालक्ष्मी मंदिर आजपासून सकाळी ६ वाजता खुले होणार !
कोल्हापूर – करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मुखदर्शन उद्या, १ जानेवारीपासून पासून भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. मंदिरात सध्या सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. ही वेळ सकाळी ६ ते रात्री ८ अशी वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या आवारातील ओटी आणि धार्मिक साहित्याची दुकाने यांनाही अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. जोतिबा मंदिरासह समितीच्या अखत्यारितील सर्वच मंदिरात आता सकाळी ६ ते रात्री ८ अशी दर्शनाची वेळ ठेवण्यात आली आहे. पर्यटक आणि भाविक यांची संख्या वाढत असल्याने समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी कोषाध्यक्ष सौ. वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार आदी उपस्थित होते.