पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेतांना अटक
भ्रष्टाचाराची बजबजपुरी असलेली सरकारी कार्यालये !
मुंबई – घराच्या वाढीव बांधकामासाठी २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पालिकेचे कनिष्ठ अभियंता गणेश बडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
बडगे हे दादर पश्चिमेकडील पालिकेच्या ‘जी नॉर्थ’ विभागातील इमारती आणि कारखाने विभागात कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदारांच्या घराच्या वाढीव बांधकामाला विरोध करत १८ डिसेंबरला बांधकाम बंद केले आणि कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा बडगे यांनी त्यांच्याकडून २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार पथकाने ३० डिसेंबर या दिवशी सापळा रचून बडगे यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.