३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), ३१ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक ज्ञानेश्वर काळेल यांना,
तर शिरोळ तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे आणि श्री. अण्णासाहेब वरेकर उपस्थित होते.