मुंबई महापालिकेच्या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद रहाणार
मुंबई – देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट अन्य राज्यांतील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. यासंबंधी मुंबई पालिका शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. १५ जानेवारीनंतर शाळा चालू होणार कि नाही, यासंदर्भातील निर्णय येत्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली.
१८ जानेवारीपासून वाणिज्य दूतावासाच्या शाळा (अमेरिकन अँड अदर काउन्स्लेट स्कूल) चालू करण्यास प्रशासनाकडून अनुमती देण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्य, शाळा आणि शैक्षणिक संस्था यांना पूर्वसिद्धता करण्याच्या सूचना दिल्या आहेत.