आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी तोडले !
|
विजयनगरम् (आंध्रप्रदेश) – येथील नेल्लीमरलामध्ये असलेल्या रामतीर्थम् येथील एका डोंगरावरील बोडिकोंडा कोदंडाराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केली. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहाच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला आणि श्रीरामाच्या मूर्तीचे शिर तोडले. ही मूर्ती ४०० वर्षे प्राचीन आहे.
Thread-
Repeat attacks on Hindu temples in Andhra Pradesh are reminiscent of actions of 16th century ruthless St. Xavier in Goa who destroyed temples & carried out forced conversions & Taliban’s destruction of giant Buddha statues in Bamiyan.
Join me & #CondemBeheadingLordRamIdol pic.twitter.com/hbeRhv17Qi— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) December 30, 2020
नंतर तोडलेले शिर येथील तलावात विसर्जित करण्यात आले. या मंदिरात मातासीता आणि लक्ष्मण यांचीही मूर्ती आहे. या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस अधीक्षकांनी सांगितले, ‘मूर्तीची तोडफोड करण्यामागे षड्यंत्र दिसून येत आहे. तरीही आम्ही अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.’ यापूर्वी राज्यातील चित्तूर जिल्ह्यातील एका शिवमंदिरामध्ये आक्रमण करून तेथील नंदीची मूर्तीची तोडण्यात आली होती.
गर्भगृह में घुसे उपद्रवी, भगवान राम की 400 साल पुरानी मूर्ति का सिर धड़ से अलग: मंदिरों पर लगातार हमलों से घिरी आंध्र सरकार#AndhraPradesh #Temple #RamMandir https://t.co/zw5lMorhJo
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 31, 2020
१. जनसेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण यांनी म्हटले की, हे काम एखाद्या वेड्याचे असू शकणार नाही. धर्मिक उन्माद असणार्यांनी हे काम केले असणार. राज्य सरकार अशा घटनांविषयी निष्काळजीपणा करत आहे. यामुळेच ही घटना घडली आहे. राज्यात सातत्याने मंदिरांवर अशी आक्रमणे होत असतांना मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत ? ते गप्प का आहेत ?
(सौजन्य : Rashtriya News Network)
(वरील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
२. तेलुगु देसम् पक्षाचे स्थानिक नेते एस्. रविशेखर आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी या घटनेनंतर येथे धरणे आंदोलन केले. तसेच मंदिराला संरक्षण देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजप जिल्हाध्यक्ष आर्. पावनी यांनीही घटनास्थळी भेट देऊन आंदोलन करत आरोपींवर कारवाई करण्याची आणि मंदिराला संरक्षण देण्याची मागणी केली.