दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचन
यथा गजपतिः श्रान्तः छायार्थी वृक्षमाश्रितः ।
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीचः स्वमाश्रयम् ॥
अर्थ : जसे थकलेला हत्तींचा राजा सावलीसाठी वृक्षाचा आश्रय घेतो आणि विश्राम झाल्यानंतर त्याच वृक्षाचा नाश करतो, तसेच नीच (दुष्ट) मनुष्य स्वतःला आश्रय देणार्याचा सुद्धा (कृतघ्नपणे) नाश करतो.
(संदर्भ : मासिक ‘वैदिक उपासना’, वर्ष : २, अंक ११, २२.७.२०२०)