सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद
महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे प्रकरण
सोलापूर – नियमबाह्य कामांसाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना शिवीगाळ केल्याची तक्रार सदर बझार पोलीस ठाणे येथे प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी काळे यांच्याविरुद्ध खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे यांसह अन्य कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.
अवैध कामे करण्यासाठी राजेश काळे अनेक दिवसांपासून पालिका अधिकार्यांवर दबाव निर्माण करत आहेत. ‘आरोग्य विभागातील कामे मी सांगतो त्याच कंत्राटदाराला देण्यात यावी, मला टक्केवारी दिल्याविना कुणाचीही कामे संमत करू नका, यापूर्वी मी अनेक लोकांवर खोटे गुन्हे नोंद करून कामाला लावले आहे, मी तुमच्याविरुद्ध ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद करेन, मंत्रालयात जाऊन तुमचे स्थानांतर करण्यास लावेन, असेही म्हटल्याचे काळे यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.