राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक दायित्व स्वीकारून त्यागपत्र द्यावे ! – धीरज सूर्यवंशी, शहर युवा मोर्चा अध्यक्ष, भाजप
तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्या विरोधात भाजप युवा मोर्चाची निदर्शने
सांगली, ३० डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर संभाजीनगर येथे बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक दायित्व स्वीकारून तात्काळ त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. धीरज सूर्यवंशी यांनी केली. संभाजीनगर येथे तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने ३० डिसेंबर या दिवशी स्टेशन चौक येथे निदर्शने करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी भाजपचे संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने, नगरसेवक श्री. निरंजन आवटी, ज्योती कांबळे, सर्वश्री किरण भोसले, अदित्य पटवर्धन, प्रथमेश वैद्य, चेतन माडगूळकर, राहुल माने, अमित भोसले, सुजित राऊत, संदीप तुपे, सोहम जोशी यांसह अन्य उपस्थित होते.