बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि पीडित यांचा तपशील प्रसारमाध्यमांनी उघड करू नये ! – तुषार पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३ नुसार पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादी आणि पीडित यांचा तपशील प्रसारमाध्यमांनी उघड करू नये, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी केले आहे.
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३ मध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या वृत्तामध्ये बालकांचे नाव, छायाचित्र, कौटुंबिक तपशील, शाळा, शेजारी किंवा ज्यामुळे बालकाची ओळख उघड होईल, असा अन्य तपशील उघड होणार नाही, असे नमूद असल्याचे अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.