शिरोडा, फोंडा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक विष्णुबुवा फडके यांचे निधन !
शिरोडा – येथील सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक विष्णुबुवा फडके (वय ९८ वर्षे) यांना ३० डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी देवाज्ञा झाली. ते सनातनच्या साधिका सौ. सुविधा फडके यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात ३ विवाहित पुत्र, २ विवाहित मुली, सुना, नातवंडे आणि पतवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार फडके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.