एस्.टी.ची सेवा अधिक सक्षम करणार ! – अनिल परब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र
कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग – प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली एस्.टी. बससेवा अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन परिवहनमंत्री, संसदीय कार्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले.
कुडाळ शहरातील गांधी चौक येथे एस्.टी.च्या नूतन बसस्थानकाचे उद्घाटन परिवहनमंत्री परब यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्या वेळी मंत्री परब बोलत होते. कुडाळ येथे प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली, एस्.टी.चे स्थानिक पदाधिकारी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
‘या नूतन बसस्थानकातील उर्वरीत कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे मंत्री परब यांनी या वेळी सांगितले.
आमदार वैभव नाईक, प्रकाश रसाळ, नगराध्यक्ष ओंकार तेली आदींची समयोचित भाषणे झाली.