ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शेती प्रश्नांविषयी केंद्र सरकारला पुन्हा आंदोलनाची चेतावणी
नगर – सर्वच पक्ष स्वार्थी असून ते केवळ आपल्या पक्षाचे हित पहातात. त्यांना खरोखरच समाजाविषयी तळमळ असती, तर आज सहस्रो शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय त्यांना दिसत नाही का ? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. त्यांनी मागील आंदोलनाच्या वेळी शेती प्रश्नांविषयी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसेल, तर आपण पुन्हा आंदोलन करणार, असेे म्हटले होते. लोकशिक्षण, लोकजागृती ही पक्षांकडून होणार नाही. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, तरच प्रश्न सुटतील. सरकार केवळ पडण्याला घाबरते, अन्य कशाला घाबरत नाही, असे अण्णा यांनी सांगितले.