शिर्डीतील साईमंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर चालू रहाणार !
नगर – नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर चालू ठेवण्यात येत असते. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीसुद्धा शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर चालू रहाणार आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या वतीने देण्यात आली; मात्र भक्तांनी दर्शनाला येतांना ‘ऑनलाईन’ पास घेऊनच यावे, असेही संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.