रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट देणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय
१. आश्रम पाहिल्यावर स्वतःचे घर आश्रमासारखे बनवण्याची खूणगाठ मनाशी बांधली !
‘आश्रमातील शिस्त, व्यवस्थापन, स्वच्छता, साधकांमधील प्रेमभाव आणि आश्रमातील चैतन्यदायी वातावरण यांमुळे मला पुष्कळ समाधान वाटले. त्यामुळे मी स्वतःचे घर आश्रमासारखे बनवण्याची खूणगाठ मनाशी बांधली आणि तशी कृती करण्याची प्रेरणा मला मिळाली.
२. ‘समाजातही वाईट शक्ती कशा प्रकारे कार्यरत असतात ?’, हे समजले !
‘वाईट शक्ती आणि चांगल्या शक्ती यांचे सूक्ष्म युद्ध कशा प्रकारे चालू आहे ?’, तसेच ‘समाजातही वाईट शक्ती कशा प्रकारे कार्यरत असतात ?’, हे मला समजले. मला तसा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.’
– श्री. संजय वनारे, चिपळूण, रत्नागिरी. (९.३.२०२०)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |