श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती
१. ‘मागच्या जन्माची पुण्याई असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सर्व कुटुंब साधना करण्यासाठी आश्रमात राहिले आहे’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे
‘१०.४.२०२० या दिवशी मला पुष्कळ शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत होता. माझे हात आणि पाय सुजले होते. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. त्यामुळे मी निराशेत गेले होते. त्या वेळी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडे नामजपादी उपाय विचारण्यास गेले. तिथे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू होत्या. त्यांनी मला होणारा त्रास विचारला आणि माझा हात त्यांच्या हातात घेऊन हातावरची सूज पाहिली. माझे हात पुष्कळ घट्ट वाटत होते. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी मला विचारले, ‘‘तुम्ही पूर्वी शेतातील पुष्कळ कामे केली आहेत’, असे वाटते; म्हणून तुमचा हात घट्ट वाटतो.’’ तेव्हा मी पूर्वी शेतातील काय काय कामे केली होती, ती श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आपले प्रत्येक साधक किती कठीण परिस्थितीतून आले आहेत. तुमची मागच्या जन्माची पुण्याई आहे; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे तुमचे सर्व कुटुंब साधना करण्यासाठी आश्रमात राहिले आहे.’’
२. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू साक्षात् श्री लक्ष्मीदेवी असून त्यांच्या माध्यमातून देवीनेच आधार दिला’, असे वाटणे आणि त्यांच्या बोलण्याने उत्साही अन् आनंदी होणे
त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी पुष्कळ वेळ माझा हात त्यांच्या हातात ठेवला होता. तेव्हा मला काही कळले नाही; पण नंतर मनात विचार आला, ‘मला त्रास होतो; म्हणून मी सारखी माझ्या मुलीला ‘घरी जाऊन येऊया’, असे म्हणायचे; पण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी हात हातात घेतल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझा हात घट्ट पकडला आहे. ‘ते मला आश्रमातून कुठेही जाऊ देणार नाहीत’, असे ते श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळकाकूंच्या माध्यमातून मला सांगत आहेत.’ नंतर दोन-तीन दिवस श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू मला श्री लक्ष्मीसारख्या दिसून ‘त्यांच्या दोन्ही हातात कमळाची फुले आहेत’, असे दिसायचे. ‘त्या श्री लक्ष्मीदेवी आहेत’, हाच विचार माझ्या मनात येत होता आणि ‘देवीनेच मला आधार दिला’, असे मला वाटत होते. त्यामुळे माझ्या मनातील निराशेचे विचार नष्ट झाले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत असतांना ‘आईच माझी चौकशी करत असून ती मला उपाय सांगत आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या बोलण्याने मी उत्साही आणि आनंदी झाले. त्यांचा विचार आल्यावर मला आनंद वाटतो.
‘देवा, तूच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या माध्यमातून मला आधार दिलास’, यासाठी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |