माझे विश्व श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ।
मी आनंदी राहू शकतो, केवळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंमुळे ।
मन अस्वस्थ असतांना धावून येती, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू ॥ १ ॥
सकाळी उठतांना पहिले स्मरण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचे ।
रात्री झोपतांनाही दिसती त्यांचे चरण हृदयामध्ये ॥ २ ॥
वैयक्तिक आवरणे असो वा समष्टी सेवेतील आवरणे ।
प्रत्येक कृती शिकता आली श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंमुळे ॥ ३ ॥
साधक विचारती, ‘भाववृद्धी आणि भावजागृतीसाठी काय करावे ।
तेव्हाही एकच उत्तर ‘माझे भावविश्व श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ ।
आणि मग न्हाऊन निघतात सर्व सद्गुरु कृपेच्या वर्षावाने ॥ ४ ॥
ज्यांची प्रीती आणि कृपा अनुभव लिहिण्यास शब्दही अपुरे पडतात ।
ज्यांच्या केवळ स्मरणाने ‘आनंदाच्या महासागरात’ रममाण होता येते ।
अशा एकमेवाद्वितीय श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ॥ ५ ॥
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू, असा कोणताच क्षण आणि प्रसंग नाही, जिथे तुम्ही माझ्या समवेत नाहीत.
– अज्ञानी बालक,
श्री. श्रीराम लुकतुके, देहली (२७.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |