मथुरा येथे रा.स्व. संघाच्या कार्यालयावर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण करून तोडफोड
आक्रमण करणार्यांमध्ये महिलांची संख्या अधिक !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून अशा प्रकारे आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातील चोरीच्या प्रकरानंतर आता ४० ते ५० जणांच्या धर्मांधांच्या जमावाने या कार्यालयावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली. यात २ स्वयंसेवक घायाळ झाले. आक्रमण करणार्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून २ पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, या कार्यालयात बांधकाम चालू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य रस्त्यालगत ठेवण्यात आले आहे. हे साहित्य चोरतांना आझमपूर येथील चांद बाबू याला रंगेहात पकडण्यात आले. त्याला काही घंट्यांनंतर सोडून देण्यात आलेे. त्यानंतर संध्याकाळी ४० ते ५० जणांच्या जमावाने संघाच्या कार्यालयावर आक्रमण करून कार्यालयाची तोडफोड केली. (धर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! – संपादक) कार्यालयावर आक्रमण झाल्याची माहिती मिळताच, संघ आणि भाजप यांचे पदाधिकारी घटनास्थळी पोचले, तसेच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.