भारतात आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी
कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे निर्णय
नवी देहली – ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ती ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेष विमाने आणि मालवाहतूक विमाने यांना यातून वगळण्यात आले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराचे विषाणू भारतात जवळपास २० प्रवाशांमध्ये आढळून आले आहेत.