आंगणेवाडी (तालुका मालवण) येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला
मालवण – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा शनिवार, ६ मार्च २०२१ या दिवशी होणार आहे. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात केवळ आंगणेवाडी येथील आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत यात्रा करण्यात येईल, अशी माहिती आंगणे कुटुंबियांकडून देण्यात आली. ‘कोरोना महामारीमुळे भाविकांच्या होणार्या असुविधेविषयी आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. भाविकांना नम्र विनंती आहे की, ज्या ठिकाणी तुम्ही आहात, त्या ठिकाणाहून श्री देवी भराडीमातेस नमस्कार करावा आणि आपले सांगणे सांगावे. आई भराडीमाता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल’, असे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे.