कवळे येथील दत्तमंदिरातील श्री दत्तगुरूंच्या उत्सवमूर्तीची पालखी संपन्न !
रामनाथी (गोवा) – दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कवळे, फोंडा येथील दत्तमंदिराच्या वतीने श्रीदत्तगुरूंच्या उत्सवमूर्तीची पालखी चारचाकी वाहनातून काढण्यात आली. २९ डिसेंबर या दिवशी येथील दत्तमंदिर ते रामनाथ मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्यात काही दत्तभक्त सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पालखी कुठेही पूजनासाठी थांबवण्यात आली नाही.