कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी अनोळखी लोकांनी माहिती मागितल्यास देऊ नये !
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती
कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी अनोळखी लोक भ्रमणभाषवरून संपर्क करून नाव, ई-मेल, आधारकार्ड इत्यादी माहिती मागत आहेत. तसेच आधारकार्ड नोंदणीकृत करण्यासाठी ‘ओटीपी’ मागितला जातो. ‘ओटीपी’ शेअर केल्यावर ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. नागरिकांनी असे भ्रमणभाष संपर्क, लिंक किंवा लघुसंदेश यांना प्रतिसाद देऊ नये. ठाणे सिटी पोलिसांनी ट्वीट करून ही सूचना दिली आहे.