३१ डिसेंबरला महाबळेश्वर आणि पाचगणीतील सर्व कार्यक्रमांना रात्री १० नंतर प्रतिबंध
सातारा, २९ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळावर अनेक पर्यटक येतात. कोरोनाच्या अनुषंगाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी ‘क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३’चे कलम १४४ मधील तरतूदीनुसार महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी ३१ डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांना रात्री १० वाजल्यानंतर चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्या संबंधितांंविरुद्ध दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.