ओडिशामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या ५० व्या विजय दिनानिमित्त व्हाईस अॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा करण्यात आला सत्कार !
भुवनेश्वर (ओडिशा) – वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या ५० व्या विजय दिनाचे औचित्य साधत व्हाईस अॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा सत्कार करण्यात आला. व्हाईस अॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.
हा सत्कार सरमा यांच्या ‘नेव्ही हाऊस’ या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात प्रख्यात नागरिक, समाजसेवक, अधिवक्ते, मान्यवर आणि लेखक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सरमा यांनी वर्ष १९७१ च्या युद्धातील स्वतःची भूमिका, तसेच नौदल आणि ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ या युद्धनौकेने विजयात पार पाडलेल्या भूमिकेविषयी सांगितले.