मुंबईमध्ये पित्याकडून मुलीवर बलात्कार, उज्जैन येथे गुन्हा नोंद
पशूंनाही लाजवणारा प्रकार हा पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचा परिणाम होय. यावर ना विज्ञानाकडे उपाय आहे ना पुरोगाम्यांकडे. श्रेष्ठतम हिंदु संस्कृतीचे शिक्षण आणि त्यानुसार आचरण यातूनच नीतीमान समाज घडू शकतो !
मुंबई – येथील एका बहुराष्ट्रीय आस्थापनामध्ये वरिष्ठ पदावर काम करणार्या एका नराधमाने स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. या नराधमाच्या विरोधात पीडित मुलगी आणि तिची आई यांनी उज्जैन (उत्तरप्रदेश) येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी ‘पोक्सो’ कायद्याच्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसमवेत मुंबई येथे रहात होती. आई उज्जैन येथे मुलीच्या आजोळी गेल्यापासून नराधम बापाने सातत्याने तिचे लैंगिक शोषण केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार १२ जूनपासून पित्याकडून तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात येत आहेत.
पीडित मुलगी उज्जैन येथे आजोळी गेल्यावर पुन्हा मुंबईमध्ये येण्यास ती सिद्ध होत नव्हती. त्या वेळी आईने विचारणा केल्यावर तिने झालेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर नराधम बापाच्या विरोधात त्यांनी तक्रार नोंदवली. तक्रारीमध्ये पीडित मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून पती मद्य पिऊन तिला मारहाण करतो. याविषयी पोलिसांत तक्रारही केली आहे; मात्र प्रत्येक वेळी क्षमा मागून पुन्हा मारहाण करत असल्यामुळे माहेरी निघून आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरेंदर सिंग यांनी हा गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.